महाराष्ट्रमनोरंजनमुंबई

चित्रीकरण परवानगीकरिता एक खिडकी प्रणाली (२.०) कार्यान्वित; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

१०० दिवसाच्या कार्यक्रमातर्गत उपक्रम

मुंबई : राज्यातील चित्रीकरण स्थळांना चित्रिकरणाच्या दृष्टीने प्रकाशझोतात आणण्यासाठी तसेच या चित्रिकरणस्थळांवर चित्रिकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणाहून मिळवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘एक खिडकी या प्रणालीचा (२.०)’
राज्यभर विस्तार करण्यात आला असून मंगळवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री ( वित्त व नियोजन) आशिष जैस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील उपस्थित होत्या.

‘एक खिडकी प्रणाली ही राज्यभरातील चित्रीकरणाची परवानगी मिळविण्यासाठी निर्माते, निर्मिती संस्थांना आणि लोकेशन मॅनेजर यांना माहिती देणारी एकमेव ऑनलाईन प्रणाली असून या प्रणालीची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे करण्यात येत आहे. चित्रिकरणासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या सुलभ पधतीने मिळणे हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे.

‘ ही प्रणाली सन २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आली असून सुरुवातीच्या काळात मुंबई आणि मुंबई उपनगरातील चित्रिकरण स्थळांवर चित्रीकरण करण्यासाठी या प्रणालीद्वारे परवानग्या दिल्या जात होत्या. आता महाराष्ट्रभर या प्रणालीचा विस्तार करण्यात आला असून त्या दृष्टीने प्रणालीचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. ही प्रणाली वापरकर्ता अनुकूल व सुलभ (User friendly) असल्यामुळे जास्तीत जास्त निर्मात्यांनी या प्रणालीचा वापर करावा असे आवाहन चित्रनगरी प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!