उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे दावत-ए-इफ्तारचे आयोजन
रत्नागिरी :उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दावत-ए-इफ्तार पार्टीला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयसामंत ह्यांनी उपस्थित राहून संबोधित केले. या कार्यक्रमातून सर्व धर्मीय बांधवांमध्ये बंधुभाव निर्माण करण्याचा उद्देश साध्य झाला असल्याचे यावेळी उदय सामंत म्हणाले. “जो या देशावर प्रेम करतो, त्याच आम्ही समर्थन करतो,” असे स्पष्ट करत, आम्ही देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्यावर भर देतो.
आम्ही ज्या पक्षात काम करतो, त्यांच्या विरोधात फेक नेरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी आमचा विश्वास विकासावर व लोकांच्या मन जिंकण्यावर आहे, असेही यावेळी उदय सामंत ह्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मुस्लिम बांधवांप्रती असलेले प्रेम व राष्ट्र उभारणीसाठीची त्यांची भूमिका स्पष्ट आहे. विकासाची ही वाटचाल व सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू, असा शब्द यावेळी उदय सामंत ह्यांनी दिला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, तालुका प्रमुख बाबू म्हाप, परशुराम कदम, सुदेश मयेकर, अल्ताफ संगमेश्वरी,अलिमिया परकार, मतीन परकार यांसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.