कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणायचंय, आहारात करा ‘या’ ५ फळांचा समावेश

चुकीच्या आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे ह्रदयविकाराचा झटका, हा हार्ट फेल्युअर यासारख्या आजारांचा धोका जास्त वाढतो. वाढलेले कोलेस्ट्रॉल पायांच्या धमन्यांमध्ये जमा होते.
तसेच वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे आणि विविध घरगुती उपचार केले जातात. असे असले तरी आहारात काही फळांचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते. अशी ५ फळे कोणती याविषयी जाणून घेऊयात.
स्ट्रॉबेरी-
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्याकरिता स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर ठरते. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँण्टीऑक्सिडंट असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
सफरचंद-
ज्यांना कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे आहे, त्यांनी आहारात सफरचंदाचा समावेश करावा. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचा घटक असतो. जे फायबरप्रमाणे कार्य करते. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ खाणे उपयुक्त ठरते.
आंबट फळे-
लिंबूवर्गीय आंबट फळांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवणारे घटक असतात. यासाठी लिंबू, संत्र, मोसंबी, आवळा, किवी यासारख्या फळांचा आहारात समावेश करावा. ही फळे जीवनसत्त्व ‘सी’चा उत्तम स्त्रोत असून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
एवोकाडो-
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहत नसेल तर ते नियंत्रणात ठेवण्याकरिता एवोकाडो खाऊ शकता. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रण राहण्याव्यतिरिक्त आरोग्याचे इतरही फायदे होतात.
द्राक्ष-
रोजच्या आहारात द्राक्षाचा समावेश करणे फायदेशीर ठरते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्याकरिता मदत होते, तसेच द्राक्ष खाल्ल्याने अतिरिक्त वजनही वाढत नाही.