महाराष्ट्रमुंबई

जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन

१७ ते १९ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवस जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई (रमेश औताडे) : जगभरातील मंदिर परिसरात सर्व धर्मीय भक्तांना व मंदिर प्रशासनाला काय काय अडचणी येतात, अन्नदान, पूजा पाठ, गर्दी नियंत्रण व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्थापन, मंदिर व भाविक याच्यासाठी सर्वांगीण व्यवस्थापन कसे असले पाहिजे यासाठी १७ ते १९ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवस जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.

” मंदिरांचा महाकुंभ ” ही संकल्पना समोर ठेवत हे संमेलन तिरुपती बालाजी या जगप्रसिद्ध ठिकाणी होत आहे. जगभरातील हजारो मंदिर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापन यासाठी जगभरातील सर्व सनातन धर्माची निमंत्रित मंडळी या संमेलनात आपले विचार, मार्गदर्शन, सूचना याचे आदान प्रदान करणार आहेत.

टेम्पल कनेक्ट आणि अंत्योदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन संस्थाना एकत्र आणत मंदिर व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नवनवीन संकल्पना मांडण्याचे आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचे हे एक जागतिक व्यासपीठ असेल असे टेम्पल कनेक्ट चे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.

या संमेलनास ८८ देशांतील सुमारे १६८२ धार्मिक संस्था सहभागी होतील , ११२ हुन अधिक मान्यवर वक्ते, १५ कार्यशाळा व ज्ञानसप्रे आणि ६० हून अधिक स्टॉल्स या मंदिरांच्या महाकुंभात असणार आहेत. असे अंत्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष निता लाड यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!