वैद्यकीय

किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या पाच गोष्टी, आहारात करा या पदार्थाचा समावेश

मुंबई – निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीराचा प्रत्येक भाग सुरळीत कार्य करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आरोग्य राखण्यात आपली भूमिका बजावत असतो. एकही अवयव नीट काम करत नसेल तर शरीरात अनेक प्रकारचे आजार आणि समस्या उद्भवतात. यापैकी एक महत्त्वाचा अवयव म्हणजे मूत्रपिंड. किडनीद्वारे शरीरातील नको असलेले पदार्थ, विषारी घटक बाहेर काढण्याचे काम चालते.

किडनी हा शरीराचा एक असा भाग आहे जो अनेक आवश्यक घटकांचे संतुलन राखतो आणि जर शरीरात कोणतेही हानिकारक अ‌ॅसिड किंवा इतर घटक जास्त झाले तर ते मूत्राद्वारे बाहेर टाकते. म्हणूनच किडनीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल, तर आहारात काही गोष्टी घेताना काळजी घ्यायला हवी, त्यांचे जास्त प्रमाण किडनीसाठी मारक ठरते.

मीठ शरीरासाठी आवश्यक असले तरी ते जास्त प्रमाणात खाल्ले जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कोणत्या ना कोणत्या पदार्थांमधून जास्त मीठ पोटात गेल्यास मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे मीठाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. लाल मांस तुम्ही मर्यादित प्रमाणात आणि फक्त अधूनमधून लाल मटन-मांस खावे.

जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. इतकेच नाही तर जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोकाही वाढतो. कृत्रिम स्वीटनर तुम्हाला मिठाई, कुकीज आणि कोल्ड्रिंक्स जास्त पिण्याची आवड असेल तर त्यावर नियंत्रण आणावं लागेल. तुम्ही यापासून दूर राहणेच योग्य ठरेल. तसेच दारू पिण्याची सवय असल्यास ती लवकरात-लवकर बंद करणं शहाणपणाचे ठरेल. कारण अल्कोहोलचा तुमच्या यकृताच्या कार्यावरच नाही तर किडनीवरही वाईट परिणाम होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!