रत्नागिरीतील आंबा उत्पादनाला पावसाचा फटका; उत्पन्नात घट होण्याची शक्यता

रत्नागिरी : कोकणाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा व काजूच्या बागा संकटात सापडल्या आहेत. या हंगामात आंबा बागायतदारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असून बागायतदारांना फक्त १० ते १५ टक्केच उत्पन्नावर समाधान मानावे लागणार आहे. पडणा-या पावसामुळे आंबा पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकन्यांवर पुन्हा एकदा फवारणी करण्याची वेळ आली आहे.
यामुळे बागायतदारांवर आणखी मोठा आर्थिक बोजा पडणार आहेजिल्ह्यात पडलेल्या या मुसळधार पावसामुळे आंबा बागायतदारांमध्ये कमालीची चिंता वाढली असून याबहंगामाच्या सुरुवातीलाच अस्मानी संकटाचा सामना करावा लागत असल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. अस्मानी संकटानंतर कोकणातील आंबा उत्पादनाला पुन्हा उभारी देण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वयाची गरज आहे.