कर्दे गावाच्या विकासासाठी राज्य शासनाने १४ कोटींचा निधी ग्रामविकास विभागाच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास निधीतून दिला.

रत्नागिरी : राज्यातीलच नव्हे, तर परराज्यातील पर्यटकांसाठी कर्दे किनारा प्रमुख आकर्षण ठरत आहे. त्या परिसरात अधिक सोयीसुविधा दिल्या तर पर्यटकांमध्ये वाढ होईल आणि रोजगार संधीही निर्माण होतील. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सादर केलेला कर्दे गावाच्या विकासासाठी राज्य शासनाने १४ कोटींचा निधी ग्रामविकास विभागाच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास निधीतून दिला आहे.
त्याचबरोबर त्या कामांना प्रशासकीय मंजूरीही दिली आहे. कोकणातील ग्रामीण भागातील भुमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विकास कामांची गती वाढविण्यासाठी ‘कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून कर्दे (ता. दापोली) येथील विविध कामांसाठी १४ कोटी २ लाखांचे विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्याला नुकतीच शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. मंजूर निधी त्या-त्या वेळी उपलब्ध करून दिला जाणार आहे.