महाराष्ट्रकोंकणमुंबईवाहतूक

मुंबईत नवीन रेल्वे टर्मिनस तयार होणार, कोकणात जाणं होणार अधिक सोयीचं

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर लवकरच आठवे टर्मिनस होणार आहे. अलीकडेच रेल्वे मंडळाने या टर्मिनससाठी मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकाजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी 150 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजुर केला जाणार आहे. या नवीन टर्मिनसमुळं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या २०२३-२४ या वर्षातील वाहतूक सुविधा अंतर्गत नवीन प्रकल्पांसाठी नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वसई रोड येथील नवीन टर्मिनसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. लवकरच या प्रकल्पाचा आराखडा रेल्वेकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर इंजिनियरिंग स्केल प्लॅन तयार केला जाणार आहे. कसे असेल नवीन टर्मिनस जाणून घेऊया. नवीन टर्मिनसमध्ये टर्मिनसवर तीन मार्गिका असतील आणि येथून फक्त मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातील.

प्लॅटफॉर्म रिटर्न ट्रेनसाठी एक आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधला जाणार आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंना ट्रेन उभ्या करण्याची सोय असेल, उर्वरित मार्गिकवर ट्रेन पार्किंगची व्यवस्था असेल. नवीन टर्मिनस सुरू झाल्यावर आणखी १२ अतिरिक्त मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवण्याची क्षमता वाढणार आहे. वसई रोड येथे नवीन कोचिंग टर्मिनस विकसित करण्याची योजना त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. रेल्वे बोर्डाने अलीकडेच या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!