असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला – सलमान खानवर अभिजीत बिचुकले भडकले

सातारा:- सलमान खानच्या बिग बॉसमधून अभिजीत बिचुकले नुकताच बाहेर पडला आहे.अशातच कॉन्ट्राव्हर्सी किंग बिचुकलेने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा २० वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला आहे.
अभिजीत बिचुकले म्हणाला,’बिग बॉसच्या घरात मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला. सलमानने माझ्यावर व्यक्त केलेला राग न शोभणारा आहे.
सलमानने १४ शो चालवले. त्याला वाटतं की तो शो चालवतो, मात्र हा १५ वा शो मी चालवला आणि इथे तो कमी पडला. त्याने जी भाषा वापरली ती आजपर्यंत मला कोणी वापरली नाही. पिंजऱ्यात वाघ आहे म्हणून तो हंटर फिरवत होता, आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. सलमान खान स्वत:ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईन की मी काय आहे’ अश्या शब्दात बिचुकलेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.