ब्रेकिंग

मेरठजवळ असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; एका आरोपीला अटक

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर मेरठमध्ये गोळीबार झाला आहे. आज ते मेरठच्या किथौधमधून दिल्लीकडे रवाना होत असताना दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्या ताफ्यावर गोळ्याही झाडल्या.यानंतर काही काळ खळबळजन्य परिस्थिती झाली होती.

यावर माध्यमांशी बोलताना ओवेसींनी,’मी किथौध, मेरठ येथील एका मतदान कार्यक्रमानंतर दिल्लीला निघालो होतो. छाजरसी टोल प्लाझाजवळ दोन लोकांनी माझ्या वाहनावर सुमारे तीन ते चार गोळ्या झाडल्या. ते एकूण ३-४ लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, त्यानंतर मी तेथून दुसऱ्या वाहनाने निघालो’,असं सांगितलं आहे.

दरम्यान मेरठ पोलिसांनी या प्रकरणी एका अटक केली असून या प्रकरणात वापरलेली शस्त्र देखील पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केली आहेत.या प्रकारामागे नेमका कुणाचा हात आहे,याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!