महाराष्ट्रकोंकण

कोकणात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; नुकसानभरपाई मंजूर करावी

मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

खेड : कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकन्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मंजूर करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना उद्देशून निवेदन लिहिले आहे. हे निवदन खेडेकर यांनी खेड तहसीलदारांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकन्यांना भात पेरणी करता आली नाही. त्यामुळे वाफे तयार झाले नाहीत. सलगच्या पावसामुळे जून महिन्यातील पहिला आठवड्यामध्ये देखील पेरण्या झाल्या नाहीत. धुळवापेवरच्या पेरण्या ह्या तात्काळ रुजवा होऊन वाफे तयार होतात. परंतु बदलत्या हवामानामुळे सर्व शेती पाण्याखाली गेल्यामुळे आता शेतीच्या पेरण्या आणि उगवणान्या वाफे आणि होणारे उत्पन्न हे कमी प्रमाणात होणार आहे. सबब हे आमच्या कोकणातील शेतकन्यांचे होणारे नुकसान आहे. आपण शासन दरबारी होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल अशा पद्धतीचा प्रस्ताव आपल्या हातून शासन दरबारीसादर करावा. अन्यथा कोकणाला कोणीच वाली नाही, असे आम्ही गृहीत धरू याची नोंद आपण घ्यावी,” असे शेवटी या निवेदनात नमूद केले आहे.

निवेदन देतेवेळी खेडेकर यांच्यासमवेत मिलिंद नांदगावकर, मनोज दांडेकर, केदार वणजु, अक्षय जांभूळकर, रोहित भुवड, सर्वेश पवार आणि प्रशांत बारटक्के उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!