पत्रकारांचा विश्वास महत्त्वाचा, महायुती सरकार कायम राहणार – उदय सामंत

मुंबई : टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांनी उपस्थित राहून पत्रकारितेच्या विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांना उदय सामंत ह्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अतिशय दिमाखदार व देखणा सोहळा पार पडला.
सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार प्रसाद लाड, अभिनेते प्रशांत दामले, माजी आमदार रवींद्र धंगेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. ज्या स्व.बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली अशा भागातून आम्ही कामं करत आहोत, याचा अभिमान आम्हाला असल्याचा विचार यावेळी उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला. सर्व पत्रकारांसोबत महायुती सरकार कायम आहे, असा विश्वास यावेळी उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला. ज्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही मोठे झालो त्या सर्व पत्रकारांचे उदय सामंत ह्यांनी मनापासून आभार मानले.
त्यावेळी बोलताना, तंत्रज्ञानाच्या युगात टीव्ही जर्नलिस्ट असोसिशन पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामं करत आहे. विविध माध्यमांचे प्रतिनिधी हे समाजातील विविध क्षेत्रातील घडामोडी सर्वांपर्यंत अचूक पोहचविण्याचं कामं करत असतात. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याच्या वृत्तीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सलाम करत असल्याचे उदय सामंत ह्यांनी म्हटले. पत्रकारांच्या माध्यमातुन समाजातील सर्वच घटकांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात व सर्व पत्रकारांना पत्रकारिता क्षेत्रात कामं करण्यासाठी सतत ऊर्जा मिळत राहो, अशा सदिच्छा व शुभेच्छा यावेळी उदय सामंत ह्यांनी दिल्या.