देशविदेश

जगातल्या पहिल्या टेक्स्ट मेसेजचा होतोय लिलाव, किंमत वाचून व्हाल हैराण!

पॅरिस:- जगात सतत काही न काहीतरी भन्नाट गोष्टी घडत असतात,अशीच एक भन्नाट गोष्ट पॅरिसमध्ये घडतेय.जगातला पहिला टेक्स्ट मेसेज व्होडाफोननं थेट लिलावासाठी उतरवलाय. हा टेक्स्ट मेसेज १९९२ मध्ये पाठवला गेला होता. हा मॅसेज एका व्हिडाफोन कर्मचाऱ्यांने दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवला होता.

आज तब्बल या गोष्टीला २९ वर्ष पूर्ण झालीत. दरम्यान २९ वर्षानंतर आता या एसएमएसचा लिलाव होत आहे. तेव्हा हा एसएमएस एका कम्प्यूटरच्या माध्यमातून रिचर्ड जारविस या व्यक्तीला पाठवला गेला होता. रिचर्ड जारविस तेव्हा कंपनीचे डायरेक्टर होते आणि त्यांच्या ऑर्बिटल 901 हँडसेटवर एसएमएस पाठवला होता.

या टेक्स्ट मॅसेजमध्ये १४ अक्षरांचा समावेश होता, असं व्होडाफोननं सांगितलं आहे. या मॅसेजमध्ये त्यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत Merry Christmas असं लिहीलं होतं. ३ डिसेंबर १९९२ रोजी पाठवलेल्या या टेक्स्ट मॅसेजचा लिलाव होत असून त्याची बोली जवळपास १ कोटी ७१ लाख रुपयांची लागली आहे.

एसएमएसची डिजिटल प्रतिचा लिलाव पॅरिसमधील एगट्स ऑक्सन हाउसमध्ये होत आहे. २१ डिसेंबर २०२१ पर्यंत हा लिलाव असणार आहे. त्यामुळे लिलावाची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!