जिल्हा जात वैधता समितीच्या दोन अध्यक्षांवर शिस्तभंगाच्या कारवाई होणार!

मुंबई : बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी सरकारने केली असून, जिल्हा जात वैधता समितीच्या पदावर रूजू न झाल्याने दोन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
नवी मुंबईच्या सिडकोमधील अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक क्षीरसागर आणि पुणे येथील सारथीचे निबंधक संजीव जाधव रुजू न झाल्यानं कारवाई महसूल विभाग कारवाई करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. क्षीरसागर यांची जात वैधता समिती चंद्रपूर येथे बदली झाली. तर संजीव जाधव जात वैधता समिती बीड पदस्थापना करण्यात आली आहे. तथापि महिनाभरापासून हे अधिकारी रूजू झालेले नाहीत.
• विद्यार्थ्यांना त्रास
विद्यार्थी वर्गासह सामाजिक आरक्षण घेवून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना तसेच नोकरी इच्छुकांनाही मोठा दिलासा देण्यासाठी राज्या २९ अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून पदस्थापना दिली ही २९ पदे काही वर्षापासून विविध कारणांनी रिक्त होती. त्यांचा अतिरिक्त कार्यभार दिला होता. यामुळे या समितीच्या कामकाजावर परिणाम झालेला दिसून येत होता. पाहिजे त्या जलदगतीने काम होत नव्हते. जात पडताळणी समितीकडे निर्णयविना रखडलेली ओबीसी , व्हीजेएनटी आणि एन टी संवर्गातील जात पडताळणीची अनेक प्रकरणे मार्गी लागतात. मात्र अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सरकारच्या लोकाभिमुख हेतुला बाधा पोचते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.