आता केवळ ‘ या ‘३ कारणांसाठीच होउ शकतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या..
बदल्याना ३० जून पर्यंत स्थगिती:राज्य शासनाचे आदेश जारी
मुंबई,दि.११:राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३० जूनपर्यंत कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात येऊ नयेत असे आदेश सामान्य प्रशासन विभागानं काढले आहेत. सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दर ३ वर्षांनी केल्या जातात. मात्र सध्या कोरोना संकटामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर ताण आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा अध्यादेश काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील दीड महिना तरी रुटिन बदल्या होणार नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी होणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया जूलै- ऑगस्ट मध्ये करण्यात आली होती. . या वर्षी देखील मार्च अखेरी पासून पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार माजल्यानंतर यंदाही नियोजित करण्यात येणाऱ्या बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
केवळ या ३ कारणांसाठीच होउ शकतात बदल्या
यंदाच्या वर्षी फक्त सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठीच फक्त बदली करण्यात येणार आहे ; तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने; एखाद्या शासकिय कर्मचाऱ्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे संबधित कर्मचाऱ्याची बदली करणे प्राधिकृत अधिकाऱ्यास खात्री पटल्यास त्याची बदली करता येणार आहे.
या तीन गोष्टींतंर्गतच बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या तीन कारणांशिवाय कोणत्याही स्वरूपात घावूक बदल्या न करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व विभागांना बजावले आहेत.
शासकीय निर्णय वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Transfer 2021 GR