महाराष्ट्रकृषीवार्ताकोंकण
‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांच्या बागेतील सहा टन पाने थेट जर्मनीत एका कॅन्सर संशोधन करणाऱ्या कंपनीला संशोधनासाठी पाठवण्यात आली.

लांजा : लांजा तालुक्यातील झापडे येथील सध्या फणस किंग म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांच्या बागेत २८ एकर क्षेत्रांवर सुमारे ७० वेगवेगळ्या जातींचे फणस लागवड केली आहे. या झाडांची पाने जर्मनीतील एका कॅन्सर संशोधन करणाऱ्या कंपनीला पाठविली आहेत.आतापर्यंत सहा टन पाने जर्मनीला निर्यात केली आहेत. त्यावर संशोधन झाल्यास लांजाचे नाव देशाच्या नकाशावर येईल, असे देसाई यांनी सांगितले.






