ब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई
सावधान ! पुढील २ दिवसात येणार उष्णतेची मोठी लाट; हवामान खात्याचा इशारा
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई:राज्यात ऊद्या व परवा म्हणजेच ३० मार्च ते ३१ मार्च दरम्यान उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने इशारा दिला असून, उष्माघाताचा धोका असल्याचे देखील कळवले आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशी महत्वाची सूचना राज्यस्तरावरुन देण्यात आली आहे.
या कालावधीत तहान लागली नसल्यास देखील पाणी जरूर प्यावे.
दुपारी 12.30 ते 3.30 पर्यंत उन्हात फिरू नये.
बाहेर जाताना छत्री, टोपी, गॉगल, पाण्याची बाटली सोबत असावी.
योग्य प्रमाणात लिंबू पाणी, नारळ पाणी, कोकम सरबत, उसाचा रस अशी शीत पेय प्यावीत.
भर उन्हात श्रमिक कामे करू नये.
नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी. व कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.






