ऑनरकिलिंगचा बळी ठरलेल्या दिवंगत विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले सांत्वनपर भेट घेणार

मुंबई : मराठा मुलीशी विवाह केल्यामुळे दलित तरुण विक्रम गायकवाड यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली.या ऑनरकिलिंग च्या घटनेचा आपण तीव्र निषेध करीत असून येत्या शनिवारी दि.22 फेब्रुवारी रोजी आज सायंकाळी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील उत्रोली या गावात भेट देऊन ऑनरकिलिंग चा बळी ठरलेल्या दिवंगत विक्रम गायकवाड यांच्या शोकाकुल कुटुंबियांची आपण सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली.
विक्रम गायकवाड हा दलित तरुण उच्चशिक्षित होता.येत्या 3 मार्च रोजी युपीएससीची मुख्य परीक्षा तो देणार होता.मात्र त्यापूर्वीच त्याची माणुसकीला काळिमा फासणारी निर्घूण हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोषी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीसांवरही कारवाई व्हावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.