महाराष्ट्रक्राइम
बीडच्या माजलगाव शहरात खळबळजनक घटना! भाजप कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या हत्या

बीड : बीडमधील भाजपचे पदाधिकारी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या जखमा ताज्या असतानाच बीडच्या माजलगाव शहरात भाजप कार्यकर्त्याची भर दुपारी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. बाबासाहेब आगे असे मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. आरोपी हत्या करून थेट पोलीस स्टेशनला हजर झाला. माजलगाव शहरात भर दुपारी बाबासाहेब आगे याची निर्घृण हत्या करण्यात आली असून, रक्ताच्या थारोळ्यात पडलेता त्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मृत तरुणाची ओळख पटविण्यात यश आले असून बाबासाहेब आगे नामक तरुण भारतीय जनता पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.