महाराष्ट्रकोंकणमनोरंजन

स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू होणार्‍या मालिकेचे चित्रीकरण होणार सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा हा सध्या चित्रपट-मालिका यांच्या चित्रीकरणासाठी आकर्षण बनला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू होणाऱ्या या मालिकेच्या चित्रीकरणाकरता मराठी कलाकारांची टीमदेखील आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे. वाहिनीचे हेड सतीश राजवाडे यांनी मालिकेतील कलाकारांसह कुडाळ गाठले असून, लवकरच ‘कोण होतीस तू… च्या शूटिंगचा याठिकाणी शुभारंभ होईल.

कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत झळकणारे मंदार जाधव, गिरीज प्रभू, सुकन्या मोने कुलकर्णी, वैभव मांगले, अमित खेडेकर, अमृता माळवदकर या कलाकारांचे कुडाळ रेल्वे स्थानकात जंगी स्वागत करण्यात आले. कोकणातील आपुलकी आणि प्रेम त्यांना रेल्वे स्थानकात दाखल होताच अनुभवता आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ रेल्वे स्थानकात ही सगळी कलाकार मंडळी पोहोचताच स्थानिक महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!