
मुंबई:श्री. माणिक मुंडे संपादित व गंगाबाई मुंडे रचित ‘गाईन ओवी गाईन नाम’ या काव्यसंग्राचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील होते. तर मंचावर मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, विख्यात कायदेतज्ञ ॲड.डॉ. निलेश पावसकर व दैनिक शिवनेर चे संपादक नरेंद्र वाबळे उपस्थित होते. ‘शिवनेर’ प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सुशीलकुमारजींनी प्रारंभीच शिवनेरकार विश्वनाथराव वाबळेंचा आवर्जून उल्लेख केला.