फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : महात्मा जोतिबा फुलेंनी सामाजिक सुधारणा आणि समतेच्या चळवळीचा पाया रचला. शेतकऱ्यांचा आसूड; गुलामगिरी असे ग्रंथ आणि जे सत्यशोधक विचारांचे अखंड लिहून समाज प्रबोधन केले. अस्पृश्यता, जातीभेद विरोधात बंड केले. स्त्रीशिक्षणांची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा फुलेंचे कार्य हे इतिहास घडविणारे क्रांतिकारी होते.त्यांच्या जीवनावर आधारित फुले हा सिनेमा समाज प्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा आहे. येत्या 25 एप्रिल रोजी संपूर्ण देशात आणि जगभर प्रदर्शित होणार आहे.फुले हा सिनेमा प्रेक्षकांनी जरूर पाहावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.
फुले सिनेमा हा कोणत्याही जाती धर्मविरुद्ध नाही. इतिहासाचे सत्य कथन सांगणारा सिनेमा आहे. टेलर बघून कोणीही या सिनेमा बाबत गैरसमज करू नये. सिनेमा पूर्ण पाहिल्यास सर्वांचे समाधान होईल. फुले सिनेमा दलित शोषित वर्गाला न्याय देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. इतिहास जे विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. त्यामुळे महात्मा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास या सिनेमातून प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे असे रामदास आठवले म्हणाले.
आज अंधेरी येथे फुले सिनेमाच्या प्रदर्शनाची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रामदास आठवले यांनी फुले सिनेमा प्रेक्षकांनी पाहण्याचे आवाहन केले.
यावेळी फुले सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्माते प्रणय चौकसी, रितेश कुडेचा, अनुया चौहान कुडेचा, जगदीश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे शैलेश भाई शुक्ला, जतीन भट्टा, प्रकाश जाधव, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
फुले सिनेमात अभिनेते प्रतीक गांधी यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे.पत्रलेखा या अभिनेत्रीचा ही या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. 25 एप्रिल रोजी देशभरातील सर्व सिनेमागृहात आणि परदेशात ही फुले सिनेमा एकच वेळी प्रदर्शित होईल अशी माहिती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिली. दिग्दर्शक अनंत महादेवन हे स्वतः ब्राह्मण आहेत. त्या मुळे ब्राह्मण समाजा विरुद्ध हा सिनेमा नाही.काही ब्राह्मणांनी महात्मा फुले यांना मदत केली होती. भिडेवाडा ज्यांनी दिला ते भिडे ब्राम्हण होते अशी आठवण अनंत महादेवन यांनी सांगितली.