मुंबईमहाराष्ट्र
मंत्री योगेश कदम यांचा राज ठाकरे यांना आपुलकीचा सल्ला

मुंबई : दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? त्याचे फायदे-तोटे याचं विश्लेषण सुरु झालं. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वर एक पोस्ट केली आहे. ‘सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला. उबाठा गटाच्या प्रमुखांची नितीं ही वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे. स्वतःचा स्वार्थ साधुन झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे’ असं योगेश कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.






