भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईत होणार:- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे:- मुंबईत भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी निधी दिला जाणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले आहे.
हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईतील कलिना येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या जागेत होणार आहे. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन एकर जागा देणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सांगितले आहे.आज पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.नवाब मलिकांनी पत्रकारांशी बोलताना मान्यता दिल्याचे सांगितले आहे.