‘त्या’ समस्यांसाठी विद्युतने शेअर केले व्यायाम प्रकार

अभिनेता विद्युत जामवाल जगभरातील टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये सामील आहे. अॅक्शन सिनेमांसोबतच विद्युत त्याच्या स्टंट आणि मार्शल आर्टसाठी ओळखला जातो. विद्युत सोशल मीडियावरही त्याच्या स्टंटचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. तसचं त्याच्या यूट्यूब चॅनवरून तो फिटनेस आणि आरोग्यासंदर्भातील महत्वाची माहिती चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो.
इतर आजारांप्रमाणे लोकांनी आता लैंगिक आरोग्यासंदर्भात मोकळेपणाने चर्चा करण्याची गरज असल्याचं विद्युतने त्यांच्या नुकत्यात शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे. लैगिंक आरोग्यासंबधी पोस्ट शेअर करत विद्युत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.
विद्युतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीचे व्यायाम पाहता येतील हे सांगितलं आहे. यूट्यूबच्या या व्हिडीओचा टीझर विद्युदने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येवर उपायकारक १९ व्यायामाचे प्रकार विद्युतच्या यूट्यूब व्हिडीओत पाहता येणार आहेत.
हा व्हिडीओ शेअर करत तो कॅप्शनमध्ये म्हणाला, “लैगिंक आरोग्याबद्दल चर्चा करण्याची हीच वेळ आहे. सोबतच इरेक्टाइल डिसफंक्शनवर बोलणं गरजेचं आहे कारण दहापैकी एका पुरुषाला इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या भेडसावू शकते. तर हे आहे कलारीसूत्र, १९ व्यायामांचा एक संच. रोज या व्यायामाचा सराव केल्यास रक्तप्रवाह वाढण्यास मदत होईल. शिवाय या व्यायामामुळे ओटीपोटाच्या खालच्या भागात लैंगिक शक्ती पुन्हा आणण्यास मदत होईल.” अशी माहिती विद्युतने दिलीय.
यावेळी तो म्हणाला, ” लैंगिक आरोग्य हा निरोगी आयुष्यातील एक प्रमुख भाग आहे. मात्र यावर आता अधिक मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे.” अशा आशयाचं कॅप्शन त्याने दिलंय.
टॉप मार्शल आर्टिस्टच्या यादीत सामील
दरम्यान, नुकतीच इंटरनेटवर जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टची यादी जाहीर झाली. यापुर्वी या यादीत जॅकी चॅन, ब्रुस ली, जॉनी ट्राय गुयेन, स्टीवन सीगल, डोनी येन, टोनी जा यांची नाव झळकत होती. आता या यादीत अभिनेता विद्यूत जामवालचं सुद्धा सामील झालंय.
ही बातमी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत दिली होती. या पोस्टमध्ये त्याने एक स्क्रीनशॉट जोडून ‘जय हिंद, कलारीपयट्टू’ असं लिहिलं होतं. गुगलवर ‘टॉप मार्शल आर्टिस्ट इन इंडिया’ असं सर्च केल्यास सगळ्यात पुढे विद्यूतचं नाव दिसून येत.