बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत 61 लाखांची फसवणूक; आरोपीला दिल्लीतून अटक!
रत्नागिरी : बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लॉंन्ड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत फिर्यादी यांची ६९ लाख १९ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करून आरोपी याने एका जेष्ठ नागरिकाला ऑनलाइन गंडा घातला. या आरोपीला पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने बेड्या घातल्या आहेत. गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादी यांना मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगितले. यावेळी फिर्यादी यांचे सीम कार्ड बंद होणार आहे अशी भीती घालत त्या निमित्ताने पोलीसांकडे तक्रारी करिता कॉल फॉरवर्ड करीत असल्याचा बहाणा करण्यात आला. यावेळी आरोपी सोबतच्या दुसन्या व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादी यांचे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आलेले आहे आणि या खात्या मधून 2 कोटी रुपयांचा मनी लॉंन्ड्रिंगचा व्यवहार झाल्याची भीती घातली. यावेळी फिर्यादी यांना त्या बँक खात्यामध्ये रक्कम भरण्यास भाग पाडत 61 लाख 19 हजार 80 रुपयाची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे तपासकामी फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बकांकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी राजीव विश्वनाथ तिवारी ( वय 47, रा. 78. नाका, शिवनगर कॉलनी, पहाड़ गंज, फैजाबाद, उत्तर प्रदेश सध्या रा. दिल्ली) येथे असल्याचे निष्पन्न झाले. दिल्ली येथे तपास पथक पाठवून कोणत्याही प्रकारचे मोबाइल लोकेशन प्राप्त नसताना स्थानिक बातमीदार तयार करून त्या आधारे सदर आरोपींना ताब्यात घेतले व त्यांना न्यायालय समक्ष हजर ठेवून त्यांची चार दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेतली आहे. गुन्ह्याचे तपास व आरोपी अटक करण्याकरिता पोलीस अधीक्षक, रत्नागिरी नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे कडील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोहवा / 157 रामचंद्र वडार, पोकों / 74 रोहन कदम, पोकॉ/1203 रामदास पिसे, पोहवा / 1040 संदीप नाईक, पोहवा /444 रमिज शेख यांनी केली. कोणीही मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन / नॅशनल सिक्युरिटी विभाग / इतर विभागातून बोलत आहोत असे सांगून तुमचे सिम कार्डचा गैरवापर झाला असून त्याकरिता तुमची चौकशी करावयाची असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल तसेच अकाऊंट व्हेरीफिकेशन करिता पैसे ट्रान्सफर करा असे सांगत असेल, तर अशा कॉल वर विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक / बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नका व अशा धमक्यांना बळी पडू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.