महाराष्ट्रकृषीवार्ताकोंकण

हवामान बदलाचे परिणाम: हापूस आंब्याचे उत्पादन यंदा 25 टक्केच

मुंबई : बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा २५ टक्केच राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे मे महिन्यात आंबा कमीच राहील. मात्र सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात पेट्या दाखल होत असल्याने पाच डझनांच्या पेटीचा दर ३ हजार रुपयांपर्यंत आहे. हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र डागी मालाला कवडीमोलाच दर मिळत असल्याने अनेक आंबा बागायतदारांनी आंबा कॅनिंगला देण्यास सुरुवात केली आहे. सध्या बाजारात कॅनिंगसाठीचा आंबा ४० रुपये किलोने दराने खरेदी केला जात आहे.या वर्षी पहिल्या टप्प्यात मोहरच आला नाही. तर पुढील दोन टप्प्यांत आलेला मोहर वांझ ठरला. डिसेंबरमध्ये आलेल्या मोहराचे उत्पादन सुरू झाले आहे. तेही एकाचवेळी हाती येत आहे. वातावरणातील बदलामुळे या वर्षी २५ ते ३० टक्के हापूसचे उत्पादन हाती येईल, असे बागायतदारांकडून सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!