महाराष्ट्रकोंकणक्रीडा
डिसेंबरमध्ये जिल्हा क्रीडा संकुल जनतेच्या सेवेत – उदय सामंत

रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यात जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या भव्य प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून डिसेंबर महिन्यामध्ये जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण होणार आहे.
लवकरच रत्नागिरीतील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा असलेले एक उत्तम क्रीडा संकुल मिळणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची स्वप्नं साकार करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे यावेळी उदय सामंत ह्यांनी म्हटले.