महाराष्ट्रकोंकण

जनजागृतीसाठी पत्रकारांनी आपल्या माध्यमातून पुढाकार घ्यावा – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : पुढारी या आघाडीच्या वृत्तपत्राच्या “पुढारी आयकॉन” गौरव समारंभ सोहळ्यासाठी रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी पुढारीच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आदर्श मान्यवरांचा व शासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे सन्मान मिळालेल्या व्यक्तींच्या उचित कार्याचा गौरव करणे व त्यांच्या भावी कार्याला पाठबळ देणे होय, असे मत उदय सामंत ह्यांनी व्यक्त केले.

आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकारी अतिशय संवेदनशील आहेत, कोणत्याही चांगल्या व खडतर प्रसंगात आपल्या जिल्ह्यातील अधिकारी कार्यतत्पर आहेत, ते आलेल्या नागरिकांचा सन्मान करतात व तातडीने काम करतात याचा मला पालकमंत्री म्हणून अभिमान आहे.

माझ्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यात 1 लाख कोटींचे उद्योग आणू शकलो आणि गडचिरोली जिल्ह्याची नक्षलवादी जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी मला काम करता आलं याचा मला अभिमान आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योगधंदे विस्तारित करण्याचे काम मला उद्योगमंत्री म्हणून करता येत आहे अशी भावना यावेळी उदय सामंत ह्यांनी व्यक्त केली.

तसेच माझ्या रत्नागिरी जिल्ह्यात अनेक उद्योग येत आहेत, संरक्षण क्षेत्रातील उद्योग आपल्या इथे विस्तारित होत आहे आणि भविष्यात आणखीन उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि आपल्या भागात आणि राज्यात रोजगार निर्मिती करण्याचे काम मला करता येत याच मला खूप मोठं समाधान आहे, यामध्ये अनेक अडचणी आणण्याचे काम काही लोक करतातं म्हणून पत्रकारांनी पुढे येऊन आपल्या वृत्तपत्रामधून जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळी उदय सामंत ह्यांनी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!