गुड न्यूज:मुंबईसह राज्यात कोरोना उतरणीला…राज्यातील रुग्ण संख्येत तब्बल १२ हजारने घट
मुंबई :आज राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिलासादायक चित्र दिसत आहे.कोरोना रूग्ण संख्येचा आलेख आता उतरणीला लागला आहे. आज राज्यात कोरोनाच्या २८ हजार २८६ नव्या रुग्णांची भर पडली असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात २१ हजार ९४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज ८६ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत २८४५ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १४५४ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.८८ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७० लाख ८९ हजार ९३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०९ टक्के आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती-
मुंबईत आज १ हजार ८५७ नवे रुग्ण आढळले असून ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ५४६ झाली आहे. तर मागील २४ तासांत ५०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट ९६ टक्के इतका आहे.