महाराष्ट्रमुंबई

शिवसेनेत दत्ता दळवींचा प्रवेश; उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का

मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि उबाठाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज (28 एप्रिल) उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणावर साधला. महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटीशांनंतर महायुती पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले, मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलीदत्ता दळवी यांच्यासह आज धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप आणि मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख 500 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने विक्रोळीत उबाठा गटाला खिंडार पडले. त्याचबरोबर मुरबाडमधील उबाठा तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवा सेना पदाधिकायांनी शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील कॉंग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील 18 सरपंचांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजी नगरमधून ओबीसी महासंघाचे 22 जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाच्या पदाधिकान्यांनी तसेच पिंटो यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधवांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!