महाराष्ट्रकोंकण

टॅक्सीचालकाचा गैरवर्तनाचा अनुभव; काश्मीरमध्ये कुडाळच्या पर्यटक महिलेसोबतचा धक्कादायक प्रकार

कुडाळ : काही दिवस आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रीती कदम यांना काश्मीर दोचादरम्यान एका टॅक्सी चालकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे हल्ल्याची चाहूल लागल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहेप्रीती कदम या आपल्या कुटुंबातील तीन अन्य महिलांसह चार जणी काश्मीर दोयासाठी गेल्या होत्या. पहलगाम येथे त्यांना एका टॅक्सी चालकाने अत्यंत उद्धट वागणूक दिली. आणि धमकावणारी वागणूक दिली. प्रीती कदम यांच्या मते, “तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता. त्याने आमचं सामान रस्त्यावर फेकलं. आमच्याकडून पैसे उकळले आणि मध्येच सोडून दिलं. त्याचं बोलणंही धक्कादायक होतं. तो म्हणाला. तुम्हाला कोणी गोळी मारली तरी आम्हाला फरक पडत नाही.

मला पोलिस आणि एसआरपीचा तिटकारा आहे. मला फक्त पेशांशी मतलब आहे. आम्हाला जो टॅक्सी ड्रायव्हर आला तो जरा रागीट आणि विचित्र स्वभावाचा होता. पहलगाममध्ये गेल्यावर पाईनचं जंगल दाखवत म्हणाला इथे सगळ्या चुडेल राहतात. पोलीसच्या गाड्या दिसल्यावर म्हणत होता पोलीस आणि सीआरपीएफशी खूप नक्रत आहे. पुढे गेल्यावर गाडी स्टाईलमध्ये वळवून थांबवली आणि म्हणाला उतरो गाडी से… आमचं सामान खाली टाकून दिलं. या घटनेनंतर प्रीती आणि त्यांच्या सहकारी महिलांना दुसऱ्या टॅक्सीची वाट पाहत थांबावं लागतं. मुंबईत परतल्यानंतर 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी समजताच प्रीती कदम यांना धक्का बसला. त्यांना टॅक्सी चालकाच्या वागणुकीतून हल्ल्याची चाहूल लागल्याची शंका निर्माण झाली. त्यांनी हा अनुभव कुडाळ येथील हॉटेल व्यावसायिक आणि पत्रकार राजन नाईक यांच्यारी शेअर केला. नाईक यांनी प्रीती यांना धीर देत त्यांचा अनुभव कॅमेऱ्यासमोर मांडण्यास प्रोत्साहित केलं.

प्रीती कदम यांनी सांगितलं की, त्या टॅक्सी चालकाचा आणि टॅक्सीचा फोटो त्यांनी काढला आहे. त्यांच्या मते, जर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी या टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन तपास केला, तर अनेक गंभीर बाबी समोर येऊ शकतात. सध्या प्रीती कदम आणि त्यांचं कुटुंब घाबरलेलं असून त्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांनी यापुढे कधीही काश्मीरला पर्यटनासाठी जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!