मोठी बातमी! पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक

पुणे:-पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.पुणे पोलिसांच्या टीमने रात्री उशिरा सुपे यांना अटक केली आहे.काल तुकाराम सुपे यांना पुण्याच्या सायबर सेल विभागाने चौकशीसाठी बोलावले होते.या चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन परीक्षार्थींना पास केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे यांच्यावर ही कारवाई केली आहे.या कारवाईनंतर राज्यात खळबळ उडाली असून तपासाचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान म्हाडा परीक्षेच्या पेपरफुटीचा गैरप्रकार उघड झाल्यानंतर सर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांकडून कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता लगेचच तुकाराम सुपे यांना अटक झाल्याने राज्यात परिक्षा गैरप्रकारांबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.