महाराष्ट्रकोंकण

कुलिंग व्हॅन सेवा सुरू; पालकमंत्री उदय सामंत यांनी केली प्रत्यक्ष वाहनचालना

सिंधुदुर्ग : सिंधुरत्न समृध्द योजनेतर्गत जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरिता पणन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यानंतर सामंत यांनी या व्हॅनची पाहणी केली व ते थेट चालकाच्या जागी बसले. सोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना घेऊन त्यांनी ही व्हॅन काही अंतर चालविली. संवेदनशील हापूसची उन्हातून वाहतूक केल्यास फळामध्ये साका तयार होण्याची भीती असते. त्यामुळे फळ खराब होते आणि त्याचा फटका अब बागायतदाराला बसतो. हे टाळण्यासाठी दूरवर आंबा वाहून नेण्याच्या उद्देशाने सिंधू- रत्न समृद्ध’ योजनेतून वातानूकुलित गाडी पणन मंडळाकडे उपलब्ध झाली आहे.

सिंधुरत्न समृध्द योजना
त्याचा उपयोग आंबा बागायतदारांना होणार आहे. त्याचे लोकार्पण आज (ता. १) पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालेबागायतदार किंवा व्यावसायिक हापूस आंबा विक्रीसाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपन्यात पाठवित असतात. याच कालावधीत प्रचंड उष्मा असल्यामुळे अनेकवेळा दूरवर वाहतूक करताना हापूस आंब्याचे मोठे नुकसान होते. बागायतदार ज्याप्रमाणे निर्यातीसाठीचा आंबा वातानुकुलीत गाडीतून नेतात, त्याचप्रकारे राज्याच्या कानाकोपन्यात पिकलेला आंबा वाहून नेला. तर उन्हामुळे होणारा त्रास जाणवणार नाही. तसेच स्वस्त भाडेदरात ग्राहकांपर्यंत आबा पोहोचेल आणि मालाची गुणवत्ता अधिक दर्जेदार राहील.

त्याचबरोबर हापूसला दरही चांगला मिळेल. ओव्याचे मार्केटिंग अधिक सक्षम करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघाच्या वतीने शेतकन्यकारिता २ रेफर व्हॅनची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. ही मागणी त्यांनी त्वरित मंजूर केली होती. सिंधू-रत्न समृद्ध योजनेमार्फत गाड्या खरेदी करण्याचे आदेश पणन मंडळाला दिले होते. त्यापैकी १ गाठी नुकतीच पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाला मिळाली आहे. ऐन हंगामात ही गाडी आंबा बागायतदारांना वापरण्यास मिळणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!