पत्रकार गिरीश कुबेर यांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी केली तक्रार
पुणे,दि.२७:पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी गिरीश कुबेर यांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे