ऑपरेशन सिंदूर: पहलगामच्या हल्ल्याचे प्रतिउत्तर – आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त

पहलगाम : अखेर तो क्षण आलाच, भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली.भारतीय वायुदलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल होतं..
उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जेश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
भारतानं दहशतवादाविरुद्धच्या लढाईला एक नवं वळण देत ‘ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, ऑपरेशन सिंदूर ही सेना, वायुदल आणि नौदलाची संयुक्त कारवाई होती. ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या कारवाईत भारतीय वायूदलानं पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर लक्ष्य साधत हल्ले केले. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये हवाई हल्ले करण्यात आले आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, पाकिस्तानी भूमीवर पाच ठिकाणी ‘भ्याड हल्ले करण्यात आले आहेत. पंतप्रधान शरीफ यांनी लिहिलंय की, या युद्धजन्य कृत्याला कडक प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि ते प्रत्युत्तर दिलं जात आहे. तसेच, पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं आहे की, पाकिस्तानचं सेन्य आणि जनता पूर्णपणे एकजूट आहे आणि देशाचं मनोबल उंचावलेलं आहे.
शाहबाज शरीफ म्हणाले की, “पाकिस्तानी सैन्य आणि राष्ट्राला शत्रूशी कसं सामोरं जायचं? हे चांगलंच माहीत आहे. आम्ही त्यांचा वाईट हेतू कधीही यशस्वी होऊ देणार नाही.” पाकिस्तानकडून भारताच्या हवाई हल्ल्याचा निषेध पाकिस्ताननं भारताकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसेच म्हटलंय की, या हल्ल्यात तीनजण ठार झाले आहेत. पाकिस्तान म्हणाललंय की, “काही काळापूर्वी, कायर शत्रूनं बहावलपूरच्या अहमद पूर्व भागात सुभानुल्लाह मशीद, कोटली आणि मुझफ्फराबाद इथे तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. असं इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे (डीजी आपएसपीआर) महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले आहेत.