भरधाव कारच्या धडकेने पुण्यात रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू!

पुणे – दिवाळीनिमित्त रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या २५ वर्षीय व्यक्तीला भरधाव कारने धडक दिली आहे. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ३० ऑक्टोबर रोजी पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागात ही घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज आता पुढे आले आहे. महत्वाचे म्हणजे या अपघाताच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांनी आरोपींचा शोध न घेतल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.”मिळालेल्या माहितीनुसार, सोहम पटेल असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ३० ऑक्टोबर रोजी रात्री तो त्याच्या सोसायटीसमोर फटाके फोडत होता, यावेळी रस्त्याने जाणाऱ्या भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो रस्त्याच्या बाजुला जाऊन पडला. या भीषण अपघातामुळे त्याच्या डोक्याचा जबर मार लागला. या अपघातानतर स्थानिकांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल ‘केले. पण त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, ८ तास उलटूनही अद्याप पोलिसांनी वाहन चालकाला शोधून कोणतीही कारवाई केलेली नाहीं. त्यामुळे आता नागरिकांकडून संताप व्यक्त होतो आहे. पुणे पोलिसांनी आरोपीला तत्काळ शोधून अटक करावी, तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे.