महाराष्ट्रकोंकण

रत्नागिरी ते महाबळेश्वर नवीन मार्ग! केबल स्टेड ब्रिजमुळे प्रवास होणार सोपा

महाबळेश्वर: कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी नवा मार्ग, रत्नागिरी ते महाबळेश्वर केबल स्टेड ब्रीजने जोडणार पर्यटकांना, प्रवाशांना आता कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी नवा जवळचा मार्ग तयार होणार आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा केबल स्टेड ब्रीज उभारण्यात येत आहे. हा ब्रीज या वर्षाच्या डिसेंबरच्या अखेरीस सुरू होणार आहे. या मोठ्या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर हे तब्बल ५० किलोमीटरने कमी होणार असून थेट सातारा ते रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे जोडले जाणार आहेत. तब्बल १७५ कोटी रुपयांचा हा ब्रीज आहे. मुंबईतील वरळी सी लिंक प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा स्वरूपाचा हा पहिल्यांदीच केबल स्टे ब्रीज उभारला जात आहे. ५४० मीटर लांबी व १४ मीटर रुंदीचा हा पूल आहे. याच पुलाच्या मध्यवर्ती ४३ मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ठ्यू गॅलरी आहे. या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट असणार आहेत तसेच दोन्ही बाजूंनी जिन्याचे मार्गही असणार आहे. या पूर्ण पुलाचे काम टी ऍण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे गाव असलेलं दरे ते बामणोली कोयना खोन्यातील गाव जोडणारा ३०० कोटी रुपयांचा आणखी एक ब्रीज उभा राहात आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील या पुलांसाठी असलेल्या राष्ट्रीय वन्य जीव मंडळाच्या सगळ्या परवानगी सहा महिन्यांपूर्वी प्राप्त झाल्या आहेत. हे तीनही पुल उभारणीचे काम गतीने सुरू आहे. कोयना, खांदाटी खोन्यात राहणान्या नागरिकांनाही याचा मोठा उपयोग होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!