दुबईत मराठी भाषिकांचा आवाज बुलंद होणार – रविंद्र चव्हाण यांची माहिती.
मुंबई : महाराष्ट्र काउन्सिलच्या ‘महा हेल्पलाइन’ आणि ‘युनायटेड महाराष्ट्र प्लॅटफॉर्म या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांमुळे दुबईस्थित मराठी माणसांचा आवाज अधिक बुलंद होईल आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक बळ मिळेल. तसेच महाराष्ट्र सरकार आणि आयपीएफ यांच्यातीत समन्वय वाढेल. काही कारणाने अडचणीत सापडलेल्या युएईस्थित मराठी लोकांना त्यांच्या मातृभाषेतून मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने 050365 HELP’ ही महा हेल्पलाइन सेवा २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. व्यवसाय आणि नोकरीनिमित्त दुबईत राहणान्या दीड लाख मराठी भाषिकांकरिता नुकतीच महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्थापन केलेल्या इंडियन पीपल्स फोरम या व्यापक संस्थेची अंगीकृत संस्था म्हणून ही परिषद कार्यरत राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दुबईत महाराष्ट्र कौन्सिलची मुहूर्तमेढ रोवली गेली, यावेळी ते बोलत होते.