महाराष्ट्रकोंकणमुंबई

यंदा आंब्याचा हंगाम महिनाभर आधीच संपला; खवय्ये निराश

रत्नागिरी : आधीच उत्पादन कमी असलेल्या आंब्याला आता पावसाचा मोठा फटका बसला आहे. यावर्षीचा हंगामही आर्थिक गणिते विस्कटणारा ठरला आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा बागायतदारांचे पेटीमागे सरासरी ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. आता बागायतदारांकडे केवळ देणी भागवण्याचे प्रश्नचिन्ह आहे. यावर्षी एकूणच आंबा हंगाम कमी होता. प्रत्यक्ष हंगाम दि. १ एप्रिल ते दि. १० मे असाच राहिला. दरवर्षी दि. ५ मेपासून दि. ५ जूनपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील आंबा असतो. मात्र यावर्षी पहिल्या टप्प्यातील म्हणजे मार्चमध्ये अवघा पाच टक्केच आंबा किरकोळ बागायतदारांकडे होता. दुसऱ्या टप्प्यात आंबा होता. परंतु, त्याचे प्रमाणही कमी होते. तिसऱ्या टप्प्यात मात्र कुठल्याच बागायतदाराकडे आंबा उपलब्ध राहिलेला नाही. त्यामुळे एक महिन्यातील आंबा हंगाम नसल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!