महाराष्ट्रविदर्भ

अमरावतीच्या माजी पोलीस अधिकाऱ्याने मरणापुर्वीच ठेवला स्वतःच्या तेराव्याचा कार्यक्रम

अमरावती – अमरावती शहर नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. अश्यातच आता पुन्हा एकदा अमरावती शहर नव्या कारणामुळे चर्चेत आले आहे. अमरावतीमध्ये एका राज्य राखीव पोलीस दलातील एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने मरण्यापूर्वी आपल्या तेराव्याचा कार्यक्रम ठेवल्याने संपूर्ण राज्यभरात या तेराव्याची चर्चा सुरु झाली आहे.

मरण्यापूर्वी तेराव्याचा कार्यक्रम कसा शक्य आहे? असा विचार आज प्रत्येकाच्या मनात आला असेल, पण हो हे खरं आहे. या व्यक्तीने फक्त तेराव्याचा कार्यक्रम ठेवलाच नाही, तर या कार्यक्रमासाठी त्यांने चक्क पत्रिका सुद्धा छापल्यात व नातेवाईकांमध्ये वाटल्यात सुद्धा. राज्य राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दगडुजी डबरासे या वल्ली माणसांने आपल्या मरणापूर्वी छापलेली तेराव्याची पत्रिका आता जोरदार चर्चेत आहे.

अमरावती येथील नवीन ITI कॉलनी रहाटगाव रोड परिसरात सुखदेव डब्रसे राहतात. त्यांचा एकुलता एक मुलगा मुंबई येथे बॉक्सिंगचा कोच आहे. तर मुलगी पोलीस उपनिरीक्षक म्हणुन रुजू होणार आहे.त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. रोजचा व्यायामही सुरू आहे.पण आपल्या मरणानंतर होणारे आपले सत्कार सोहळे आपल्याला बघता येणार नाहीत. म्हणूनच त्यांनी हा आगळा वेगळा प्रयोग केल्याचे बोलले जात आहे.

काय लिहिले आहे तेराव्याच्या निमंत्रण पत्रिकेत?
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे,कि मला सेवानिवृत्त होऊन ५ वर्षे सहा महिने होत असल्याने आणि मी सेवानिवृत्त होऊन पेन्शनचा आनंद घेत असल्यामुळे पुढील आयुष्य जगण्याची मनोइच्छा नसल्याने तसेच माझा मुलगा बाहेरगावी नोकरीला असल्याने माझे केव्हा मरण येईल याची शाश्वती नाही.हा कार्यक्रम स्वइच्छेने करीत आहे.तरी या कार्यक्रमाला आपली इच्छाशक्ती दर्शवावी ही नम्र विनंती.आपला प्रार्थी सुखदेव डबरासे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!