Big Breaking :आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला;कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक!

सिंधुदुर्ग- संतोष परब मारहाण प्रकरणी अखेर न्यायालयाने अंतिम सुनावणी घेत नितेश राणेंना अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.या सुनावणीदरम्यान नितेश राणे चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचा दावा फिर्यादींच्या वकिलांनी केला होता. मात्र, आमदार नितेश राणे यांनी तपासात पूर्ण सहकार्य केल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बोलताना केला.
या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे.शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात त्यांनी नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
१८ डिसेंबर रोजी ही घटना घडल्यानंतर त्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचे अधिवेशनात देखील पडसाद उमटले होते. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केल्यापासून भाजपा आमदार नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याचं दिसून येत आहे.
सध्या सिंधुदुर्ग पोलिस भाजपा आमदार नितेश राणे यांचा शोध घेत असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.याबाबतची औपचारिकता पोलिसांनी पूर्ण केली असून आमदार नितेश राणे यांचा ठावठिकाणा पोलिस शोधतायेत.