महाराष्ट्र

स्तनदा व गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्यामध्ये उंदीर सापडलेल्या घटनेची आमदार किरण (भैय्या ) सामंत यांनी त्वरित घेतली दखल…

घटनेचा अहवाल वरिष्ठाना कळवून संबंधितावर कारवाई करण्याचे दिले आदेश..

रायगड : कोंडगाव मुरलीधरआळी येथील अंगणवाडी मध्ये स्तनदा व गरोदर माता यांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्यात मृत उंदीर आढळला होता. त्यावेळी कोंडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जोयश यांनी त्याठिकाणी जाऊन संबंधितावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर त्याठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या सौ. पेजे यांनी येऊन घटनास्थळी येऊन पंचनामा तयार केला. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे या गंभीर घटनेची दखल घेऊन लांजा राजापूर साखरपा आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी माहिती घेत जिल्हा परिषद महिला बालकल्याण खात्याकडून माहिती घेत संबंधितावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

सदर एजन्सी ही कोटा मिल कंपनी राजस्थान येथील असल्याचे समजले. तसेच आपण महिला बालकल्याण मंत्री यांच्याशी सदर प्रकाराबाबत चर्चा करणार असून या योजनेमध्ये जे काही आवश्यक बदल असतील ते करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोंडगाव मधील ग्रामस्थांनी आमदार किरण (भैय्या) सामंत यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!