महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविणार-उदय सामंत

रायगड जिल्हयात दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे गौरवोद्वार
रायगड – मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी असा उपक्रम राबविणारे रायगड जिल्हा परिषद पहिली असल्याचे गौरवोद्वार पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले. रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी १५६ ई-शॉप वाहनांचे वाटप करण्यात येत आहे. या वाहनांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे १५ लाभार्थ्यांना ई-शॉप वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना पुढील काही दिवसात घरपोच वाहन पोहचविले जाणार आहे. राज्यात दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी असा उपक्रम राबविणारे रायगड जिल्हा परिषद पहिली असल्याचे गौरवोद्वार पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांना रोजगार करता यावा यासाठी ई-शॉप वाहन ही योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दिव्यांग बांधव ७१, मागासवर्गीय बचतगट २८, महिला बचतगट ५७ लाभार्थ्यांना ई-शॉप वाहन देण्यात येत आहे.
या योजनेचा शुभारंभ मंगळवारी पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते १५ लाभाथ्यर्थ्यांना वाहनाचे वाटप करून करण्यात आला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, समाजकल्याण अधिकारी श्यामराव कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणस्नेही ई-शॉप वाहन सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे आहे.