महाराष्ट्रकोंकण
जिजामाता पुरस्काराने गौरव – पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मातोश्रींना मानाचा सन्मान

मुंबई : घराच्या चौकटीत राहून समाजकार्य करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या मातोश्री स्वरूपा रवींद्र सामंत याना ‘जिजामाता पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश सामंत यांनी दिली. प्रसिद्ध उद्योजक रवींद्र सामंत आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव यांच्या कर्तृत्वाचा आलेख सतत उंचावत ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांचे हसतमुखाने आदरातिथ्य करणे हेच त्यांचे जीवनव्रत बनल्याचे योगेश सामंत म्हणाले.