महाराष्ट्रकोंकणमुंबई

रायगड समजावून घ्यावा तो राजू देसाई यांच्या कडूनच ; शिवभक्ताने घडविले सत्तरीतल्या शिवप्रेमींना रायगड दर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : रायगड समजावून घ्यावा तो राजू देसाई यांच्या कडूनच, अशा शब्दांत सत्तरीतल्या शिवप्रेमींनी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. मल्ल्या-वराडकर फ्रेंड्स क्लबच्या ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ सभासदांनी रायगड अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांच्यासोबत किल्ले रायगड भ्रमंती केली. भर उन्हात असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी राजू देसाई यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला तपशीलवार समजावून घेतला. राजदरबारात राजू देसाई यांनी शिवराजाभिषेक वर्णन केल्यावर ‘जय भवानी, जय शिवाजी’ या बुलंद घोषणांनी राजदरबार दुमदुमला. सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर रायगड दर्शन झाल्याचे समाधान दिसत होते. राजू देसाई आणि रायगड हे एक अविभाज्य समीकरण आहे . रायगड पहावा आणि माहिती जाणून घ्यावी ती राजू देसाई यांच्याकडूनच अशा प्रतिक्रिया काही ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या. माहिती देतांना गडावरील इतर पर्यटकांनी राजसदरेवरही घोषणा दिल्या. राजू देसाई यांच्या या ५०३ व्या रायगड फेरीत आम्ही सहभागी झालो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लवकरच राजूची १००० वी रायगड फेरी होवो, अशा सदिच्छा ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!