महाराष्ट्रमुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या निषेधार्थ विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन केले. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात त्वरित कारवाईची मागणी करत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे आमदार एकवटले.
विरोधकांनी “कोश्यारी ते कोरटकर, भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान” असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. तसेच, “सोलापूरकर ते कोरटकर, अटक करा” अशा घोषणा देत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरून आंदोलन केले. या आंदोलनामुळे वातावरण तापले.