महाराष्ट्रक्रीडामुंबई

विजयाच्या जल्लोषात मुंबई इंडियन्सची ११व्यांदा प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्री!

मुंबई : वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दिमाखदार विजय नोंदवत प्लेऑफ्समधील आपले स्थान पक्के केले आहे. दुसरीकडे या सामन्यातील पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकासह नमन धीरनं केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १८० धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर १८१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२१ धावांत ऑल आउट झाला. गोलंदाजीत मुंबई इंडियन्सकडून मिचेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सलग चार सामने जिंकले होते. पण त्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली. हंगामाची सुरुवात सलग चार विजयासह करून प्लेऑफ्स न खेळू शकणारी दिल्ली कॅपिटल्स ही पहिली टीम ठरलीये. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाने सुरुवातीच्या पराभवाची मालिका ज्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध संपवली त्या संघाविरुद्ध दिमाखदार विजय नोंदवत मुंबई इंडियन्सच्या संघाने ११ व्या वेळी प्लेऑफ्समध्ये अगदी थाटात एन्ट्री मारलीये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!