पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी संगमेश्वर येथील बस स्थानकाची केली प्रत्यक्ष पाहणी
संगमेश्वर : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संगमेश्वर येथील बस स्थानकाची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर पाहणी केली.
या ठिकाणी प्रवाशांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, सुविधा कितपत उपलब्ध आहेत. आणि भविष्यातील गरजांची पूर्तता कशी करता येईल याचा उदय सामंत ह्यांनी बारकाईने अभ्यास केला. प्रवाशांना येथील सेवा अधिक सुकर व सुरक्षित होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, स्वच्छता आणि नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने उदय सामंत यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले.
पाहणी दरम्यान स्थानिक नागरिक, प्रवासी व बस स्थानकावरील कर्मचान्यांशी उदय सामंत यांनी संवाद साधला. त्यांच्या सूचना, अनुभव व अपेक्षा ऐकून घेतल्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवून, तसेच लवकरच आवश्यक सुधारणा करून बस स्थानकाचे स्वरूप अधिक आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित होण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. संगमेश्वर बस स्थानकाचा विकास हा केवळ प्रवासी सेवा सुधारण्याचा नाही, तर या भागाच्या सर्वांगीण प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जनतेच्या सहकार्याने या भागाचा विकास करण्यासाठी लोकाभिमुख, पारदर्शक व योजनाबद्ध पद्धतीने काम करत राहू अशी ग्वाही उदय सामंत ह्यांनी दिली.