विद्यार्थ्यांमध्ये मिसळले मंत्री उदय सामंत; क्रिकेट खेळून घेतला आनंद!
रत्नागिरी : आज रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विविध शासकीय संस्थांचा आढावा घेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या दौऱ्यात त्यांनी लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय या संस्थांच्या कामकाजाचा तपशीलवार आढावा घेतला.
या आढावा बैठकीदरम्यान संस्थांच्या अडचणी, गरजा तसेच भविष्यातील विकासकामांचा आराखडा यावर सखोल चर्चा झाली.
या बैठकीनंतर, उदय सामंत यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळून खास क्षणांचा अनुभव घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शिक्षणाबरोबरच खेळ आणि आरोग्याचेही महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांना खेळ्यानासाठी चांगले ग्राउंड तयार करणार असल्याचं असल्याचं आश्वासन दिलं.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य उदय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.